Ad will apear here
Next
डी. गुकेश बनला देशातील सर्वांत लहान ग्रँडमास्टर
जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत लहान ग्रँडमास्टर बनण्याचा विक्रमही नावावर
डी. गुकेशनवी दिल्ली : चेन्नईच्या अवघ्या साडेबारा वर्षांच्या डी. गुकेशच्या रूपाने देशाला सर्वांत कमी वयाचा ग्रँडमास्टर मिळाला आहे. १७व्या दिल्ली आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत खेळताना त्याने १५ जानेवारी २०१९ रोजी हा विक्रम केला. तो भारतातील पहिल्या, तर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत लहान वयाचा ग्रँडमास्टर ठरला आहे. 

१२ वर्षे सात महिने आणि १७ दिवस एवढे वय असलेल्या डी. गुकेशची जगातील सर्वांत कमी वयाचा ग्रँडमास्टर होण्याची संधी केवळ १७ दिवसांनी हुकली. तो विक्रम रशियाच्या सर्जी कर्जाकिनच्या नावावर आहे. देशातील सर्वांत कमी वयाचा ग्रँडमास्टर होण्याचा विक्रम चेन्नईच्याच आर. प्रज्ञानंदच्या नावावर होता. तो १२ वर्षे आणि १० महिने वयाचा असताना ग्रँडमास्टर झाला होता. आता मात्र तो विक्रम डी. गुकेशने मोडला आहे. प्रज्ञानंदचा खेळ पाहूनच गुकेशने खेळाची प्रेरणा घेतली होती, असे त्याच्या वडिलांनी सांगितले.

ग्रँडमास्टर होण्यासाठी आवश्यक असलेली तिसरी आणि अंतिम स्पर्धा तो दिल्लीत खेळत होता. त्यात त्याने हे यश मिळविले. गुकेश हा भारताचा ५९वा ग्रँडमास्टर ठरला आहे. त्याचे ‘फिडे’चे मानांकन २४९७ एवढे आहे. बॉबी फिशर आणि विश्वनाथन आनंद हे त्याचे आदर्श आहेत. याआधी बार्सिलोना येथे झालेल्या स्पर्धेत तो ही कामगिरी करू शकला असता, तर जगातील सर्वांत कमी वयाचा ग्रँडमास्टर ठरला असता. तेथे ही कामगिरी शक्य न झाल्याबद्दल तो काहीसा उदास झाला होता; पण पुढील कामगिरीवर लक्ष केंद्रित केले तर यश आपोआपच मिळेल, अशा विचाराने त्याने पुढील वाटचाल सुरू ठेवली आणि यशस्वी झाला.

‘मी ग्रँडमास्टर बनलो याचा आनंद आहे. आता मला अधिक मोठ्या स्पर्धांमध्ये सहभागी होता येईल. विश्वनाथन आनंद सरांबरोबर कधी तरी खेळण्याची माझी इच्छा आहे,’ अशी प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली. ‘मी कोणताही ताण न घेता केवळ माझ्या खेळावर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे यशस्वी झालो,’ असेही त्याने सांगितले. ‘मला माझा खेळ आणखी सुधारायचा आहे आणि सुपर ग्रँडमास्टर बनायचे आहे,’ असे तो म्हणाला. 

(महाराष्ट्रातील खेळाडूंबद्दलचे क्रीडारत्ने हे सदर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZPKBW
Similar Posts
६४ घरांचा ६४वा राजा! प्रीथू गुप्ता भारताचा नवा ग्रँडमास्टर नवी दिल्ली : दिल्लीचा प्रीथू गुप्ता हा भारताचा ६४वा ग्रँडमास्टर ठरला आहे. ‘पोर्तुगीज लीग २०१९’च्या पाचव्या फेरीत इम लेव्ह यान्केलेविच याला हरवून प्रीथूने ग्रँडमास्टर होण्यासाठी आवश्यक असलेल्या २५०० एलो गुणांचा निकष पूर्ण केला. विश्वनाथन आनंद हा ग्रँडमास्टर होणारा भारताचा पहिला बुद्धिबळपटू. १९८८मध्ये तो ग्रँडमास्टर झाला
दहा सरकारी बँकांचे चार बँकांमध्ये विलिनीकरण होणार नवी दिल्ली : देशातील दहा सरकारी बँकांचे चार बँकांमध्ये विलिनीकरण करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी (३० ऑगस्ट २०१९) नवी दिल्लीत केली. त्यामुळे सरकारी बँकांची संख्या २७वरून १२ होणार आहे. विलिनीकरणानंतर बँक कर्मचाऱ्यांची कोणतीही कपात केली जाणार नाही, असेही सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले
मायलेकींची एकाच वेळी सरकारी नोकरीत निवड चेन्नई : आई आणि मुलगी यांची एकाच वेळी सरकारी नोकरीत निवड होण्याची अनोखी घटना चेन्नईत घडली आहे. तीन मुलींची आई असलेल्या ४७ वर्षीय एन. शांतिलक्ष्मी यांनी त्यांची २८ वर्षीय मुलगी आर. थेनमोझीसह सरकारी नोकरीसाठीची परीक्षा दिली. दोघीही परीक्षेत उत्तीर्ण झाल्या.
राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत औरंगाबादची ऋतुजा बक्षी विजेती पुणे : अखिल मराठी बुद्धिबळ संघटनेच्या वतीने, पुणे जिल्हा बुद्धिबळ  संघटनेतर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय मानांकन खुला गट राज्य निवड चाचणी फिडे रेटिंग स्पर्धा नुकतीच पुण्यात पार पडली. या स्पर्धेत संपूर्ण राज्यातून २३३ खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत औरंगाबादची ऋतुजा बक्षी प्रथम क्रमांकाची विजेती ठरली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language